
सोन्याचे दागिने घालून मिरवणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजितदादांच्या रडारवर !
सध्या सोन्याचे भाव वाढत असून ते 1 लाखाच्या बाहेर गेले आहेत. तरिही सर्वसामान्यांचा खरेदीचा ओढा हा सोन्याकडे असून नवं नवी दालणं आता खुली होताना दिसत आहे. अशाच एका दालणाचे उद्घाटन नुकताच पुण्यातील चाकणमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते झालं. मात्र या वेळी त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांची फिरकी घेतली. तसेच कानपिचक्याही दिल्या. ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
अजितदादांनी, सोन्याचे दागिने घालणं हे स्त्रियांनाच शोभून दिसते. पुरुषांनी उगीच त्या भानगडीत पडू नये. गळ्यात सोन्याच्या जाडजूड चेन घालणारे पुरुष अथा बैलांसारखे दिसतात, ज्यांच्या गळ्यात साखळी घातलेली असते. सध्या सोनं लाखांच्या बाहेर गेलं अशलं तरिही अनेकांना सोनं घेणं ते अंगावर घालणं याची मोठी हौस असते. यासाठी लोकं आपली जमिन जुमलाही विकतात. काहींची तर गोल्डन मॅन म्हणून ओळख आहे. काही तर सोन्याचे कपडेच वापरतात. काहीतर सोन्याच्या जाडं जूड साखळ्याच गळ्यात घातलून फिरताना दिसतात.
यावरूनच अजितदादांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. त्यांनी, माझं पुरुष मंडळींना आणि तरुणांना एकच सांगणं आहे की, सोनं हे आपल्या मातेच्या, पत्नीच्या, बहिणीच्या आणि मुलीच्या अंगावरच शोभून दिसतं. ते पुरुषांच्या अंगावर नाही. त्यामुळे पुरुषांनी नको त्या भानगडीत पडू नका.
उगाचच बैलाच्या गळ्यात जशी साखळी घालतो, तशी सोन्याची साखळ्या घाल नका. असे आता अवेक जण समोर येताना दिसत आहेत. हे सगळं ते त्यांच्या पैशाने करतात. मात्र सोनं हे आपण घरातील स्त्रीधनासाठी असून ते त्यांनाच दिलं तर जरा जास्तच चांगलं आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सरकार उद्याच्या बैठकीत निर्णय घेईल…
यावेळी अजित पवार यांनी राज्यातील पुरस्थिती आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीवर देखील भाष्य केलं. ते म्हणाले, आमच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. अनेकांचे झाले देखील आहेत. यावेळी शेतकऱ्यांची नाराजी, त्यांचा रोष आणि राग देखील पाहायला मिळाला. या पुरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे घरदार उध्वस्त झालं असून शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. जमिनी देखील खरडून गेल्या आहेत.
त्यामुळेच आता अशापद्धतीने प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आम्ही देखील या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, यासाठी निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नुकताच दिल्लीचा दौरा केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यातील स्थितीची संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशीही मागणी केली आहे.
मुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांना जे काही लागतं ते देणार असून सरकार त्यांच्या पाठीशी आहे, हेच आम्हाला त्यांना सांगायचं आहे. दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन सरकारचे असून आत्ता तातडीची 5000 रुपये, अन्न-धान्य, कपडे, निवारा अशी मदत सरकारकडून केली जात असल्याचेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.