
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
चिखली रणथम ( मलकापूर):दि.६. पाण्यासाठी दहा दहा, बारा बारा दिवस वाट पाहूनही पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी उपसरपंच व सदस्यांसह सरपंच झाल्या घरावर मोर्चा काढत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला. ही घटना मौजे चिखली रणथम येथे घडली. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली. चिखली रणथम येथील पाणी पुरवठा गेल्या अनेक महिन्यापासून विस्कळीत झाला आहे. दुधलगाव येथील विहिरीवरून चिखली रणथम येथे पाणी पुरवठा करण्यात येतो.उन्हाळ्यात या विहिरीचे पाणी कमी झाल्यानंतर पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र्य विहीर अधिग्रहित करण्यात येते.मात्र यावर्षी गेल्या सहा महिन्यापासून हा पाणीपुरवठा विस्कळीत असून यामुळे गावातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यादरम्यान उपसरपंच विलास लहानु बोडदे, ग्रामपंचायत सदस्य गिताबाई देवराज मेहेंगे,यांच्यासह गावातील अनेक महिलांनी सरपंचाचे घर गाठत सरपंच यांना पाणीपुरवठा बाबत विचारणा केली असता सरपंच पती व गावकऱ्यांमध्ये या विषयावर वादविवाद झाला. अशी माहिती देवराज मेहंगे यांनी दिली असून यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी व महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला. उपसरपंच विलास लहानु बोदडे सह ग्रामपंचायत सदस्य गिताबाई देवराज मेहेंगे,देवराज मेहेंगे, सलमा इंगळे, लता गोरे ,मंगला एमनेरे, आशा गोरे, जनाबाई बोधडे, वाघे, वनमाला मेहेंगे, सूशीला विटे, अर्चना कीनिकर, वंदना मेहेंगे, आदी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.