
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि.६. युवा ग्रुपचा प्रथम वर्धापन दिन नांदुरा येथे पार पडला. त्यानिमित्तयुवा ग्रुप च्या माध्यमातून कोरोना योद्ध्याचे योगदान लक्षात घेता छोट्या व तरुण मित्रांसाठी covid-19 सोबतचा लढा या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम पांडव मंगल कार्यालय नांदुरा येथील संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. आमदार चैनसुख संचेती उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शन श्रीकांत कस्तुरे व प्रमुख पाहुणे डॉ. जयस्वाल उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वंदेमातरम ने झाली. त्याचबरोबर युवा ग्रुपचे वेदान्त वाणी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी अंबिका तेलकर हिने केले. तसेच आभार प्रदर्शन जितू मोरे यांनी केले.कार्यक्रमात विभाग ग्रुपचे विशाल डागा, श्रेयस पतंगे ,पियुष मिहान व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. गट क्रमांक एक मध्ये प्रथम बक्षीस दिव्या तेलार कर, भुतिया बक्षिस सई जालमकर, तृतीय बक्षीस संजना खेते, व गट दोन मध्ये प्रथम बक्षीस ज्ञानेश्वरी नरडे, द्वितीय बक्षीस नेहा उज्जैनकर, तृतीय बक्षीस माधुरी माळी हिला मिळाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.