
दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी-प्रदिप मडावी
कोरपना तालूका भारोसा
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो
पण कर्जबाजारी झाल्यावर त्याच्या मनात
आत्महत्येचा विचार कां येतो?
आकाशाकडे बघत पावसाची आशा करतो
आणि दुःखाचे अश्रू डोळ्यावाटे काढत असतो
मनातच वरुण राजाची प्रार्थना करत असतो
येरे येरे पावसा म्हणत त्याकडे डोळे लावून बसतो
पाऊसपाणी चांगले होऊन पीक चांगले येईल
या आशेने आपल्या मुलांना शाळेमध्ये टाकतो
आणि बायको-मुलांना सुखाची आशा दाखवतो
पण स्वतः मात्र कष्ट आणि दुःखच भोगत असतो
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो
पण कर्जबाजारी झाल्यावर त्याच्या मनात
आत्महत्येचा विचार कां येतो?
जगाची भूक भागवण्यासाठी तो शेतामध्ये राबराब राबतो
दुसऱ्याचं पोट भरुन स्वतः कयना- कोंडा खात असतो
दुसऱ्याच्या सुखातच त्याचं सुख मांडत बसतो
त्याच्या फाटक्या संसाराचा मात्र ,विचार कोण करतो?
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो
पण कर्जबाजारी झाल्यानंतर त्याच्या मनात
आत्महत्येचा विचार कां येतो?
तो आपलं दुःख कुणालाच कळू देत नसतो
आपलं दुःख लपवत तो आनंदात बोलतो, हसतो
बिनभरवशाच्या शेतीवर विश्वास ठेवतो
चांगले पीक येईल या आशेवर जगत असतो
शेतकरी हा जगाचा पोशिंदा तो असतो
पण कर्जबाजारी झाल्यानंतर त्याच्या मनात
आत्महत्येचा विचार कां येतो?