
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा: दि.६ प्रधानमंत्री व रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम झालेले असुन निधी उपलब्ध असतांना जाणीव पूर्वक त्रास दिला जातो तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजनेच्या विहिरींच्या दुरूस्ती काम पूर्ण झालेले आहे तसेच निधी उपलब्ध असतांना रक्कम जमा झालेली नाही .पावसाळ्याचे दिवस जवळ येत असुन उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी रक्कम एक आठवड्याच्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करून देण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे वतीने आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. अशाचप्रकारचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदुरा यांना दि.६ जूनला देण्यात आले.ह्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अजाबराव वाघोदे, सरचिटणीस, मधुकर तायडे, अजाबराव गाडे,रमेश ठाकरे,दशरथ दांडगे,अशोक वानखडे, जनार्दन सरदार,निलेश दाभाडे, अर्जुन पाईक, मिलिंद गाडे इत्यादीच्या सह्या आहेत. ह्या निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बुलडाणा, जिल्हाधिकारी बुलडाणा वतहसीलदार नांदुरा यांना देण्यात आल्या आहेत.