
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज (दि.६) जून रोजी ३४० वा.राज्याभिषेक सोहळा अतनूर ता.जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सरपंच चंद्रशेखर अशोकराव पाटील यांच्या हस्ते भगवा ध्वज उभारून राज्याभिषेक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सरपंच चंद्रशेखर पाटील, उपसरपंच बाबुराव कापसे, ग्रामसेवक फिरोज शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सोहळा साजरा करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष इस्माईलसाब मुंजेवार, तंटामुक्ति समितीचे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे जळकोट तालुका उपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, माजी सैनिक आयुब शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद संगेवार, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळाचे माधवराव नाईकवाडे, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष बी.जी. शिंदे, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक बाळासाहेब शिंदे, राहुल गायकवाड, ग्रा.पं.सदस्य सुनील कोकणे, विठ्ठल बारसुळे, मारोती गुंडीले, विश्वंभर बिंचकुंदे, गायकवाड मामा, मारोती मामा, चंद्रकांत गायकवाड आदीजण उपस्थित होते.