
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
श्री संत साधू महाराज संस्थान कंधार च्या वतीने गत दोन वर्षाचा कालखंड वगळता प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री क्षेत्र कंधार ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जेष्ठ कृ.आष्टमी ८, दिनांक २१जुन २०२२ रोजी मंगळवार सकाळी कंधार येथून दुपारी १२.००वाजता निघणार असून रात्री गणपती मंदिर देऊळगल्ली लोहा येथे होणार असून चन्नावार व गडम यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
गत दोन वर्षाच्या राज्यासह,देशावरील, जगावरील कोरोना संकटाने सर्व मंदिरे, देवस्थान यांना कुलुप लागले होते.अनेक भाविक भक्तांनी यात्रा न करता देवदेवतांची दर्शन प्रत्यक्ष रित्या काही अंशी घेता आले नाही.शासनाच्या वतीने कोविड चे नियम शिथिल केल्यामुळे वारकरी, भाविक भक्तांनी परंपरा चालू ठेवली.सदरिल दिंडी यापुढेही विश्रांती घेत व मुक्काम करत करत पायी दिंडी सोहळा त्यापुढे माळेगाव,अहमदपूर,चापोली,घरणी,लातूर,साकरा,मुरूड,तेर,तडवळे,यडशी,घारी,बार्शी,कुर्डुवाडी,आरण,आष्टी मुक्काम करत करत आषाढ शु.आष्टमी दिनांक ७ जुलै २०२२रोजी गुरुवारी पंढरपूर येथे पोहचणार असल्याचे मठाधिपती गुरूवर्य श्री ह.भ.प.एकनाथ साधु महाराज कंधार व दिंडी चालक ज्ञानेश्वर महाराज साधु कंधार, संयोजक श्री संत साधु महाराज संस्थान कंधार, उमरखेड, पंढरपूर यांनी कळविले आहे.