
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कलंबर :- लोहा तालुक्यातील कलंबर येथील संजय गांधी ज्युनियर काॅलेजचा ९६% निकाल लागला असून बारावी विज्ञान शाखेतून कु.शिंदे भाग्यश्री सुधाकर या विद्यार्थ्यीनीने ७०.८३%घेवून प्रथम आली आहे. तसेच कला शाखेतून कु. मोरे किरण बाबुस ७६.३३% घेऊन प्रथम आली आहे. कु. तेलंगे अंकिता बळीराम ७०.८३ (विज्ञान), कु. बलवदे विद्या गोपाल ७४.५०%(कला), कु. भागिले वैभवी शिलपारसिंह ६९% (विज्ञान),कु.गायकवाड विशाखा प्रेमदास ६९%(विज्ञान), भोकरे संगमनाथ संजय ६८.६७%(विज्ञान),कु. वडजे ज्योती गणेश ७४ %(कला) सर्व विद्यार्थ्यीनीनी बाजी मारली आहे. या सर्वांना संस्थेचे अध्यक्ष श्री. मारोतीराव पाटील घोरबांड , संस्थेच्या सेक्रेटरी श्रीमती मुद्रिकाबाई घोरबांड, ज्युनियर काॅलेजचे प्राचार्य श्री. एस. एन. मामडे साहेब यांनी सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुढील काळात असेच यश संपादन करून गरुड भरारी मारावी अश्या शुभेच्छा दिल्या आहेत. काॅलेजमधिल सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अभिनंदन केले आहे.