
दैनिक चालु वार्ता पारनेर प्रतिनिधी-विजय उंडे
पुणेवाडी/पारनेर:-पुणेवाडी ता. पारनेर येथे ७१ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे बांधकाम कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर होते तर प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके, माजी जि. प. सदस्य आझद ठुबे मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना ३०५४ अंतर्गत पुणेवाडी ते पारनेर रस्ता नवी पुलासह मजबुतीकरण करणे (ग्रामा-६३) १५ लक्ष, पुणेवाडी फाटा ते पुणेवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (इजिमा-३२७) १५ लक्ष, पुणेवाडी येथील भैरवनाथ देवस्थान येथे पाण्याची टाकी बांधणे- ६ लक्ष, दत्त मंदिर सभामंडप करणे – ३.५० लक्ष, लोटकेदरा, गाडेकर वस्ती सभामंडप करणे- २ लक्ष व ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोग अंतर्गत विविध ३० लक्ष रुपयांची विकास कामांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले पुणेवाडी येथील भैरवनाथ मंदिर देवस्थान मुळे या गावाला ओळख तयार झाली. भैरवनाथावर आपली श्रद्धा आहे. पुणेवाडी भैरवनाथ देवस्थानास लाखो लोक दर्शनासाठी येतात. त्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरामध्ये पाण्याची टाकी देण्याचाही निर्णय आपण घेतला. आपण माझ्याकडे उशिरा आले परंतु तरीही आपणास ४० लक्ष रुपयांची कामे दिली.ही विकास कामे करत असताना एक उद्देश आहे की समाजामध्ये चांगले काम करणारी माणसे आहेत. त्यांच्या पाठीमागे समाज उभा राहीला तरच तालुक्यात चांगल्या विचारांचे वातावरण तयार होईल. सरपंचांनी याठिकाणी खंत व्यक्त केली, हे खरे आहे तालुक्याच्या तहसील मध्ये कुठलीही कामे मार्गी लागत नाहीत. तलाठी गावात महिना महिने येत नाही. उडवा उडवीची उत्तरे दिली जातात, पोलीस स्टेशनमध्ये ही तशीच परिस्थिती आहे म्हणून आम्ही निर्णय घेणार आहोत तालुक्यामध्ये सर्व सामान्य जनतेची पिळवणूक होणार असल्यास, पानंद रस्ते अडवले जाणार असल्यास, खोटे गुन्हे दाखल होणार असल्यास, तालुक्यातील जनतेने समोर येऊन जाब विचारण्याची वेळ आली आहे. आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूक चांगल्या विचारांची माणसे निवडून द्या. झालेल्या चुका सुधारण्याची वेळ आली आहे आणि वेगळे वातावरण तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आयोजकांनी चांगले कार्यक्रमाचे आयोजन केले आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके, माजी जि. प. सदस्य आझाद ठुबे यांनीही मनोगत व्यक्त केले.
” तालुका प्रशासनावर कोणाचा वचक राहिला नाही. तहसीलमध्ये उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वारस नोंदी, ७/१२ वरील फेरफार नोंदी वर्षानुवर्ष होत नाही. मी तहसील मध्ये एका कामाकरीता गेलो असता त्यांनी मला ऑनलाईन पहा असे सांगितले, परिस्थिती चांगली नाही : सरपंच बाळासाहेब रेपाळे पुणेवाडी”
यावेळी सरपंच बाळासाहेब रेपाळे, विभाग प्रमुख बाबा रेपाळे, उपसरपंच विशाल दुश्मन, चेअरमन सुहास पुजारी, मा. सरपंच भास्कर पोटे, बाबाजी पोटे, तुषार सोनवणे, अनिल दुश्मन, रमेश पुजारी, बंशी रेपाळे, उद्योजक राजू भोर , दिलीप पुजारी, गोरख पोटे, फक्कड चेडे, अमोल रेपाळे, युवराज दुश्मन, गणपत रेपाळे, बापू पुजारी, कारभारी लांडे, भाऊसाहेब चेडे, दीपक रेपाळे, सिताराम पोटे, बापूसाहेब औटी गुरुजी, ज्ञानदेव रेपाळे, साठे मॅडम,औटी मॅडम, मंगल रेपाळे, स्वप्निल पुजारी, गाडेकर साहेब, मोहन पुजारी, जीवा रेपाळे, तुळशीराम रेपाळे, वामन रेपाळे, पोपट दुश्मन, मच्छिंद्र पोटे, बाळू चेडे, सुभाष रेपाळे, सचिन पोटे, वैभव पोटे, दगडू बोरुडे, शिवाजी रेपाळे, बाळासाहेब चेडे, रमेश रेपाळे, अक्षय दुश्मन, बाळू मगर, विनायक दुश्मन, बाजीराव बोरुडे, नामदेव दुश्मन, संतोष गाडेकर, विठ्ठल रेपाळे, गंगाराम बोरुडे, किशन रेपाळे, सोपान दुश्मन, राजाराम चेडे, ग्रामसेवक संजय मते, कामाचे ठेकेदार बबन वाळुंज, विनायक कवाद, फारुख शेख, शाखा अभियंता शिरसागर साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबा रेपाळे यांनी केले. प्रास्ताविक सरपंच बाळासाहेब रेपाळे तर सर्वांचे आभार विशाल दुश्मन यांनी मानले.