
दैनिक चालु वार्ता माळाकोळी प्रतिनिधि-गणेश वाघमारे
मार्च 2022 पासुन मिटर रिडिंग घेणारी कंपनीने ग्राहकांना आतापर्यंत मनात येईल तशी रिडिंग दिली व मार्च महिन्यात त्यांना धारेवर धरण्यात आले कि अवास्तव मिटरवरील रिडिंग टाकून देण्यात आली आता सर्व साधारण घरगुती मीटरचे बिल पाच हजार ते पन्नास हजारापर्यंत पोहोचले.
आता एकिकडे खरीप पेरणीपूर्व हंगाम बि बियाणे, खते,वेळेवर शेतकरी वर्गाला मिळत नाहित तर दुसरीकडे महावितरण बिल भरण्याचा जिवाला घोर आता बर्याच गावातून लाईट बिलाविषयी शंका व्यक्त होत आहेत,लाईट बिल नाही भरावे तर लाईट कट होण्याची भिती आणि भरावे तर हजारो रूपये तंगीच्या काळात भरायचे तरी कसे असा यक्षप्रश्न अनेक मीटरधारकांच्या मनात आहे.पेरणी करावी खत न्यावा कि लाईट बिल भरावे असे मत ग्राहक व्यक्त करत आहेत. उन्हाळा अजुन संपला नाही उकाड्यात व उन्हाळ्यात मीटर विद्युत पुरवठा खंडित करण्यात येवु नये ,काहितरी मार्गदर्शन करून मार्ग काढावेत व जास्तीत जास्त बिल आलेल्या ग्राहक याना कमीत कमी लाईट बिल करून दिलासा द्यावा अशी ग्राहक मंडळीकडून चर्चा होत आहे.मीटर ग्राहक मंडळीला ईकडे आड आणि तिकडे विहिर अशी बिकट अवस्था ग्राहकांची झाली आहे लोहा महावितरण कर्मचारी वर्गासोबत चर्चा केली असता मीटर रिडिंग दुर्लक्ष झाले व जास्त बिल तुमच्या वाट्यास आले असे सांगून मोकळे होत आहेत.आता ग्राहक मंडळीकडून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.