
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : लोहगाव विमानतळावरील पार्किंगची समस्या लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. या परिसरात सुरू असणाऱ्या मल्टिमॉडेल पार्किंगचे काम अंतिम टप्प्यात असून सप्टेंबरपर्यंत ही सुविधा सुरू होण्याची चिन्हे आहेत. याबाबत विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी माहिती दिली आहे.
विमानतळ विस्तारीकरण आणि वाढती प्रवासी संख्या पाहता, भविष्याच्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरणाने मल्टिमॉडेल पार्किंग उभारण्याचा निर्णय २०२० मध्ये घेतला. त्यानंतर “पीपीपी’ तत्वावर पेबल्स इंडिया कंपनीला हे काम देण्यात आले.
शिवाय, प्रवाशांसाठी पाचदारी पूल बांधण्यात येत असून त्याचे काम देखील अंतिम टप्यात आहे. तो देखील सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. पुणे विमानतळाला २०१७ आणि २०१८ मध्ये प्रवाशी सुविधांसाठी गौरविण्यात आले होते.
विमानतळावर प्रवासी सुविधांसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. भविष्यातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता पार्किंग सुविधा विकसित केली जात आहे. सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून, तिचा वापरही तेव्हाच सुरू होणार आहे. वाहनतळ पूर्ण होताच परिसरतील विस्कळीतपणा थांबेल. वाहनतळाचे दर हे नियमाप्रमाणे असतील,
असे संतोष ढोके, संचालक, लोहगाव विमानतळ यांनी सांगितले आहे.