
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दैनिक मेहकर टाइम्स विश्व जगतचे जालना जिल्हा उपसंपादक जगदीश राठोड यांची स्वराज्य पत्रकार संघाच्या जालना जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे जगदीश राठोड गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार क्षेत्रांमध्ये काम करीत आहेत पत्रकार क्षेत्रात काम करीत असताना गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी ते अहोरात्र प्रयत्न करीत असतात आपल्या बातम्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना सुद्धा धारेवर धरत असतात सर्व पत्रकारांमध्ये एकजूट असावी यासाठी ते सतत धडपड करीत असतात त्यांची काम करण्याची जिद्द पाहून स्वराज्य पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष निलेश नाहटा, राष्ट्रीय उपाध्यक्ष अंकुश राठोड यांच्या सूचनेवरून राष्ट्रीय सचिव उद्धव फंगाळ यांनी जगदीश राठोड यांची जालना जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे