
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
समृद्धी संतोष जाधव मराठी विषयात १०० पैकी ९९ गुण घेऊन महाराष्ट्रात राज्यात प्रथम
अखंड पणे यशाची परंपरा कायम राखत लोहा येथील श्री संत गाडगे महाराज उच्च माध्यमिक विद्यालय ची कु समृद्धी संतोष जाधव या विद्यार्थ्यांनीने मराठी विषयात १०० पैकी ९९ गुण घेऊन महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.असून सदरिल विद्यार्थ्यीनीचे व मराठी विषयाचे प्रा.गजानन जामगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.तर संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे ०६ विद्यार्थी. तर ९९ गुण घेणारे ०५ विद्यार्थी आहेत.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक व संचालक जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई डॉ. केशवरावजी धोंडगे यांनी केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून मराठी विषयात महाराष्ट्रातून प्रथम आलेल्या कु.समृद्धी संतोष जाधव विद्यार्थ्यांनीच्या पुढील शिक्षणाचा खर्च श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार तर्फे करण्याची हमी दिली.
यावेळी मराठी विषय शिक्षक प्रा.गजानन जामगे संस्कृत विषय शिक्षक सौ.प्रा.एस.एस. शिंदे यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे यांनी केला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. बोधगिरे,उपमुख्याध्यापक अनिल जाधव,उपप्राचार्य ए.पी.दापके,पर्यवेक्षक सूर्यवंशी, बी.डी.जाधव,बी.आर.पाटील,प्रा.बालाजी चव्हाण,प्रा.एकनाथ जाधव, प्रा.बबन पवार,अमोल ढगे यासह सर्व शिक्षक बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा.गजानन जामगे यांनी केले.
शाळेचा एकूण निकाल-९८.३१ टक्के विज्ञान शाखा-९८.९७ टक्के, वाणिज्य शाखा-९९.२१ टक्के ,कला शाखा-९७.१५ टक्के. मराठी विषयात समृद्धी संतोष जाधव मराठी विषयात १००पैकी ९९गुण घेऊन महाराष्ट्र राज्यात प्रथम संस्कृत विषयात १०० पैकी१०० गुण घेणारे ०६ विध्यार्थी तर ९९ गुण घेणारे ०५ विद्यार्थी
६५२ ब ५३९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ९६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण