
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे:खेड-शिवापूर टोल नाक्यावरील गर्दी कमी करायची असेल, तर तो शिरवळ याठिकाणी स्थलांतरित केला पाहिजे. टोल बूथजवळ गाडी येईपर्यंत गाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा प्रत्येक रांगेत हातात मशिन घेऊन कर्मचाऱ्यांनी टोलचे पैसे घ्यावेत, त्यामुळे वेळ वाचेल आणि गर्दी होणार नाही,’ असे वाहनचालक राहुल पोकळे यांचे मत आहे.वाहनांच्या गर्दीपुढे फास्टॅगचे लोटांगण या मथळ्याची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली. त्यावर वाचकांनी टोल नाक्याबाबतच्या व्यवस्थेविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत. टोल नाक्यावर जी गर्दी होते, ती टाळण्यासाठी खालील उपाय करावेत. एमएच १२ क्रमांकाच्या चारचाकींसाठी दोन रांगा वेगळ्या ठेवा. त्यांना टोलमध्ये सवलत आहे किंवा नाही, याची मोठी पाटी टोल नाक्यापासून अर्धा किलोमीटरआधीच लावावी. मोठ्या ट्रकसाठी वेगळी लेन ठेवावी. ज्या वाहनधारकांशी कटकट चालू होते, फास्टटॅग व्यवस्थित चालत नाही अशांना ताबडतोब रांगेतून पुढे काढावे, टोल नाक्यावरील कामगारांचे पोलिस व्हेरीफिकेशन केलेले असले पाहिजे. अशा मागण्या वाहनचालकांच्या आहेत.