
दैनिक चालू वार्ता पालघर जिल्हाप्रतिनिधी-प्रा.मिलिंद खरात .
सोमवार दिनांक 6 जून2022 रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.ट्रस्ट) संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र मुंबई येथे संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील व भारतातील 25 क्षेत्रातून पुरस्कारासाठी निवडलेल्या 111 पुरस्कार्थींना राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षक अशोक गायकवाड यांना महाराष्ट्र राज्यातून निवड करून राष्ट्रस्तरीय भारतज्योती MVLA शिक्षक प्रतिभा सम्मान अवॉर्ड 2022 ने सुप्रसिद्ध इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डाॅ.जयलक्ष्मी सानिपीना राव,सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डाॅ.हेमाली जोशी ,सुप्रसिद्ध समाजसेविका व समुपदेशिका सौ.मिनाक्षी गवळी यांचे हस्ते मानाचा फेटा,मानकरी बॅच,महावस्त्र,गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन यथोचित सन्मान स्वागत सत्कार करून गौरविण्यात आले.
याच संस्थेच्या वतीने ,तसेच अनेक विविध नामांकित संस्थांच्या वतीने या आधीसुद्धा शिक्षक अशोक गायकवाड( भिवंडी,जि.ठाणे)यांना शैक्षणिक व सामाजिक उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.शिक्षक अशोक गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,आज 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा दिन,अशा महान दिनानिमित्त मला हा राष्ट्रीय पुरस्कार देशातील नामांकित संस्थेच्या वतीने प्राप्त झाल्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. तसेच ज्या महामानवामुळे मी घडलो, मला प्रेरणा मिळते असे विश्वरत्न, भारतीय संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी दादर येथे जाऊन सहपत्नी अभिवादन कले.या पुरस्कारामागे माझी सहचारिणी सुवर्णा गायकवाड हिचा मोलाचा वाटा आहे.या राष्ट्र- स्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटना-महाराष्ट्र राज्य,सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद ,समतासैनिक दल मुंबई ठाणे पदाधिकाऱ्यांच्या वतीने तसेच विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील सन्मानिय पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे