
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा
गंगापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३ व्या वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून ध्वजारोहन ज्येष्ठ नागरिकांनी केले आहे व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर निळ, संतोष माने, गणेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, शहरध्यक्ष अहमद पटेल, फैसल चाऊस, सुरेश नेमाडे, योगेश पाटील, खालेद नाहदी, ज्ञानेश्वर साबणे, वाल्मिक सिरसाठ, रावसाहेब तोगे,शहर उपाध्यक्ष आनंता कुमावत, टिळे आबा,सोपान देशमुख, शामभाऊ धुत, ब्रदर जहुरी, कैलास खाजेकर, राजु शेख राकेश कळसकर, तुकाराम सटाले, नवनाथ कानडे, गोरख जाधव,युसुफ बागवान,आसिफ मंसुरी, विलास सौदागर,फेरोज पठाण, अरविंद खाजेकर , भाऊसाहेब गवळी कायगावकर तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी युवकांनी व युवतींनी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनीआदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व जणांनी एकत्र येऊन लढलं तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला शिवाय राहणार नाही शहर उपाध्यक्ष आनंता कुमावत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गंगापूर