
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
ता. कोरेगांव पिंपोडे बुद्रुक येथे राजमुद्रा महिला प्रभाग संघ वार्षिक अहवाल सन २०२-२०२२ वार्षिक अहवाल बैठक संपन्न झाली. यावेळी उत्तर कोरेगांव तालुक्यांतील सर्व बचत गटांच्या अध्यक्ष सर्व सदस्या व गटातील पदाधिकारी तसेच प्रमुख पाहुवणे सन्माननीय मा. कृषी सभापती मंगेश धुमाळ दादा, सौ रुपाली राजेंद्र धुमाळ अध्यक्ष राजमाता ग्रामसंघ करंजखोप, सौ. निर्मला विनायक धुमाळ, उत्कृंष्ट राजमाता ग्रामसंघ सौ. वर्षा मांढरे मॅडम कोषाध्यक्ष,सौ. सोनाली धर्माधिकारी तालुका अभियान व्यवस्थापन यांच्या हस्ते कार्यक्रमाप्रसंगी दीपप्रज्वलन करण्यांत आले. यावेळी प्रमुख पाहुवणे सन्माननीय मंगेश दादा धुमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले यांच्यासह बचत गटांच्या सर्व महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर काही बचत गटाच्या महिलांनी गाण्यांतून मनोगत सादर केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे राजमुद्रा ग्रामसंघ बचत गटाच्या महिलांच्या वतीने भव्य स्वागत करण्यांत आले. कार्यक्रमप्रसंगी बचत गटांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी यांनी वार्षिंक अहवाल सादर केला .तर काही महिलांनी आपले स्टॉल कार्यक्रमांच्या ठिकाणी लावण्यांत आले होते. तर काही बचत गटांना त्यांनी केलेल्या कामांची पोचपावती म्हणून उत्कृंष्ट जाहीर पुरस्कार प्रदान करण्यांत आला.या कार्यक्रमासांठी बहुसंख्येने महिलांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुण्यांनी तसेच सर्व बचत गटांच्या महिलांनी व निमंत्रित महिलांनी स्टॉलची पाहणी करीत यावेळी खरेदीही केली. कार्यक्रम याठिकाणी राजमुद्रा ग्राम संघाच्या वतीने येणाऱ्या सर्व महिलांसाठी चहा पाण्यांची व नाश्त्यांची व्यवस्था करण्यांत आली होती