
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
ईस्लाम धर्माचे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द वापरून ईस्लाम धर्माच्या भावना दुखावणाऱ्या आणि समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी लोह्यातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे.
ईस्लाम धर्माचे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात नुपूर शर्मा यांनी अपशब्द वापरल्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून जातीय दंगल पसरवू पाहत आहेत. आशा लोकांविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे नोंदवून त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. आशी मागणी लोहा शहरातील मुस्लीम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे लोहयाचे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. समाजात जातीय विष पसरविणाऱ्या नुपूर शर्मा यांना तत्काळ अटक करून शिक्षा देण्यात यावी. अन्यथा मुस्लिम समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर निहाल अहमद मंसुरी,शेख युनुस, इमाम लदाफ, पत्रकार शेख युनुस, फिरोज मणियार, गौस पटेल शेख,मोईज हबीबसाहब, शेख मुजाहीद इब्रहीम साहब, शेख गफार अ. सत्तार साहब, गफार, अझर अजमोद्दीन साहब, शेख जावेद हैदरसाहब, मो. गौस रहेमान साहब आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.