
दैनिक चालु वार्ता शहादा प्रतिनिधी : क्रिष्णा गोणे
आंबेडकर चौक नंदुरबार : आज दि. १० जुन, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डाँ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी)नंदुरबार यांच्यातर्फे आयोजित अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक युवती करिता एक महिना कालावधी नि:शुल्क (अनिवासी) उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम रमाई समाज मंदीरआंबेडकर चौक नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार टाकुन अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक ढाकणे ( जिल्हा उधोग ) यांनी केले तर जिल्हा समतादूत प्रकल्प अधिकारी मिनाक्षी दांडवेकर यांनी देखिल प्रशिक्षणार्थिंना बार्टी संस्थेच्या योजना mpsc/upsc स्पर्धा परिक्षा व इतर विषयावर मार्गदर्शन केले, तसेच आकाश दादा आहिरे युवा संघटने चे अध्यक्ष उधोग व्यवसाय साठी युवकांनी पुढे यावे असे आवाहन केले प्रशांत साळवे सर यांनी देखिल उधोजक म्हणून कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याविषयावर मार्गदर्शन केले व सदरील प्रशिक्षण एक महिना कालावधीचा असुन त्यासाठी दोन जूनला उद्योजकता विकास प्रशिक्षण परिचय मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या मोफत उद्योजकता परिचय कार्यक्रमात आलेल्या युवागंटांची निवड करुन 10 जून पासुन तर 12 जुलै पर्यंत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे व निवड झालेले उद्योजक व्यवसायक होण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र नंदुरबार येथे संपर्क करण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा प्रकल्प अधिकारी मिनाक्षी दांडवेकर व तालुकासमन्वयक सारिका दहीवेलकर ,जयश्री कढरे , करणकाळे हिमंत , कल्पना ठाकरे,मनिषा वळवी यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाचे रुपरेषा दिपक ढाकणे जिल्हा प्रकल्प अधिकारी जिल्हा उद्योग केंन्द्र नंदुरबार यांनी केले
गांव भेट :- रमाई समाज मंदिर , आंबेडकर चौक नंदुरबार