
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासूर स्टेशन येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेशेजारी असणाऱ्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची दुरावस्था झाली असून ग्रामपंचायत मात्र याकडे सोयीस्करपने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्मारक समितीचे अद्यक्ष गोविंद शेलार यानी केला असून याठिकाणी ग्रामपंचायतनें विकासकामे लवकर सुरु न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही समाजबांधवाच्यावतीने दिला आहे.
याठिकाणी मोकाट जाणवरे घाण करत असून हायमास्ट दिवे नसल्याने अंधार आहे त्यामुळे मदयपी लोकं याठिकाणी दारू पितात काही महाभाग तर अंधाराचा गैरफायदा घेऊन स्मारक परिसरातील ठिकाणी लघुशंकाही करतात दोन दिवसापूर्वी आमदार प्रशांत बंब यांच्या मित्रमंडळाच्या वतीने बसवण्यात आलेल्या बाकड्याचीही तोडफोड अज्ञात समाजकंटाकांनी फोडले आहे त्यामुळे याठिकाणी हायमास्ट दिवे, सिसिटीव्ही कॅमेरे, पेव्हर ब्लॉक बसवण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतकडे केली आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासन कुंभाकर्णी झोपेत असून जाणीवपूर्वक लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकच्या विकासकामाकडे दुर्लक्ष करत आहे मात्र जर काही अनुचित प्रकार घडला त्र याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतची असेल असेही शेलार यानी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले
प्रतिक्रिया :-
मीनाताई संजय पांडव (सरपंच)लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या विकासकामांच्या बाबतीत लेखी निवेदने ग्रामपंचायतला प्राप्त झाली आहे मात्र टप्याटप्याने महापुरुषांच्या स्माराकांचे विकासकामे चालू आहे त्यात विविध विभागाच्या विकासनिधीतून छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकारण झाले असून लवकरच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व समतानगर येथील आंबेडकरांच्या स्मारकांचे सुशोभीकरण करण्यात येईल.