
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
अहमदनगर : नगरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाजपा खासदार सुजय विखे पाटील बोलत होते.नगरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाजपा खासदार सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी विखे म्हणाले की, मी खासदार म्हणून निवडून येण्यात इथल्या शिवसेनेचा ५० टक्के वाटा आहे, याची मला जाणीव आहे. म्हणूनच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधातही बोललो नाही. माझं आजही हेच मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरुन ते पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. त्यामुळे ठाकरेंनी वेळीच सावध व्हावं.