
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
पालघरः आज पालघर जिल्ह्यातील सु प्रसिद्ध पर्यटन स्थळ सुर्यमाळ येथे शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन पर्यावरण मंत्री मा.ना.आदित्य ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काजुच्या वृक्षाची लागवड करण्यात आली.यावेळी श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की सुर्यमाळ सारख्या पर्यटन स्थळांचा विकास होत असुन आज वृक्ष लागवड करुन येथील सौंदर्यात अधिकच भर पडणार आहे, तसेच लवकरच या ठिकाणी मा.आदित्य ठाकरे साहेब यांना येथील माहिती देऊन,या स्थळाला भेट द्यावी अशी विनंती करणार आहोत.तसेच सर्व जनतेला वृक्ष लागवड करुन पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे असे आवाहन या वेळी श्री प्रदीप वाघ यांनी केले.
यावेळी विक्रमगड विधानसभा संघटक श्री प्रल्हाद कदम, माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री प्रदीप वाघ, माजी सरपंच विष्णू हमरे, संजय वाघ, ग्रामपंचायत सदस्य श्री संजय हमरे, चेअरमन श्री नंदकुमार वाघ, श्री रामदास हमरे श्री दत्तु हमरे, वाळु बदादे, संजय वाघ,सागर पाटील, नामदेव बदादे,शिवराम वाघ, मधुकर वाघ इत्यादी शिवसैनिक तसेच महिलावर्ग व लहान मुले उपस्थित होते.