चिपळूण (प्रतिनिधी / स्वाती हडकर) :
कोकणात अग्रगण्य असलेली लोकप्रिय चिपळूण अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालय आणि मुख्य शाखेचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुरुवार दि. १९ मार्च रोजी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
चिपळूण शहराच्या बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या चिपळूण अर्बन बँकेची प्रगती सातत्याने सुरू असून बँकेची नवी वास्तू आता लवकरच ग्राहकांच्या सेवेत येणार आहे. गुरुवार दि. १९ मार्च रोजी चिपळूण अर्बन बँकेच्या नव्या इमारतीचे भव्य उद्घाटन उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरीचे सोपान शिंदे, नगराध्यक्ष उमेश सपकाळ, चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल, उपाध्यक्ष धनंजय खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी, संचालिका राशिका पाथरे, निहार गुडेकर, निलेश भुरण, रहीमान दलवाई, प्रशांत शिरगांवकर, समीर जानवरकर, गौरी रेळेकर, राजेश कळककर, मिलिंद कापडी, रत्नदीप देवळेकर, समीर टाकळे, सुनील खेडेकर, संपदा रेडीज, दिलीप दळवी, विवेक रेळेकर, दिनेश रेडीज, श्रीराम देवळेकर, सतीश खेडेकर, विराज दळवी, मधुसूदन माने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चिपळूण अर्बन बँक ही अनेक वर्षांपासून ग्राहकांना विश्वासार्ह व दर्जेदार बँकिंग सेवा देत आहे. बँकेची नवी वास्तू अत्याधुनिक सुविधा व प्रशस्त जागेसह उभारण्यात आली असून यामुळे ग्राहकांना अधिक सोयीस्कर व जलद सेवा मिळणार आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण असून बँकेच्या प्रगतीमुळे चिपळूणच्या बँकिंग क्षेत्रात आणखी भर पडणार आहे.
