
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
पालघर:-आमदार श्री सुनीलजी भुसारा यांनी विक्रमगड विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे परंतु हा निधी योग्य ठिकाणी खर्च होत नसल्याचे सूत्रांकडून समजत आहे.सध्या आमदार निधीतून अनेक खेडोपाडी सोलर पॅनल बसवले जात आहेत परंतु हे सोलर पॅनल ज्या ठिकाणी गरज आहे अश्या ठिकाणी न बसवता त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या दारात हे पॅनल बसवले असल्याचे अनेक ठिकाणाहून सूत्रांच्या माध्यमातून समजत आहे.परंतु याचा फटका आमदार सुनील भुसारा यांना पुढच्या मतदानात पडेल का असा सवालही अनेक ठिकाणी उपस्थित होत आहे आमदार हा सर्व जनतेचा लोक प्रतिनिधी असतो परंतु या क्षेत्रात मात्र आमदार हे फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांचेच आहेत का असा सवाल आता सामान्य जनतेला पडला आहे.