
इगतपुरी प्रतिनीधी – विकास पुणेकर
इगतपुरी शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बाजारपेठेत भाजीपाला, फळे व किराणा विक्रीच्या गाळ्यांसमोरच कचऱ्याचे ढीग रस्त्यावर साचले आहेत. या ठिकाणी इगतपुरी शहरातून तसेच तालुक्यातून हजारो नागरिक येत असतात. त्यात सध्या सुरु असलेल्या नवरात्र उत्सवामुळे बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. पावसाळ्यात या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
स्थानिक नागरिकांनी इगतपुरी नगरपरिषदेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या असूनही जाणूनबुजून व हेतुपुरस्कर कचरा वेळेवर उचलला जात नाही, असा आरोप केला जात आहे. व्यापाऱ्यांनाही या परिस्थितीचा फटका बसत असून ग्राहक त्रस्त झाले आहेत.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता इगतपुरी नगरपरिषद प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी व तात्काळ लक्ष देऊन कचरा व्यवस्थापनाची योग्य पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले अन्यथा नगरपरिषदेणे त्यांचे कार्यालयासमोरच डंपिंग ग्राउंड करावा म्हणजे नियमित कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे तसेच
संपुर्ण इगतपुरी बाजारपेठेत एकच मुतारी असल्यामुळे तेथे देखील लाईटाची व्यवस्था नाही त्यामुळे याचाच गैरफायदा घेऊन अनेक मंडळी येथे रात्री दारू पिण्यास बसतात याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे.