
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-दादासो वाक्षे
आटपाडी –
महाराष्ट्र शासनाने २०१७ व २०१९ मध्ये कर्ज माफ़ी जाहीर केली परंतु शेतकरी कर्ज माफी असून सुद्धा त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही तर आत्ता शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा घेत आहे पशी नोटिसा शेतकऱ्यांना पाठविण्यात आली आहेत त्याचा निषेध म्हणून विभुतवाडी येथील हनुमान विविध कार्यकारी सोसायटी च्या समोर ठिय्या आंदोलन गाढव बांधून त्याला गाजर दाखवणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश जुगदर यांनी तहसीलदार पोलिस स्टेशन सहाय्यक निबंधक यांच्याकडे दिली आहे
निवेदनात म्हटले आहे की वरील विषयास तालुक्यातील अनेक शेतकरी 2017 व 2019 च्या कर्जमाफी पासून वंचित राहिले आहेत .तर अत्ता अनेक वित्तीय संस्था कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा ताबा घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली बँक काही शेतकऱ्यांचा जमिनीचा ताबा घेण्यासाठी दिनांक 20/06/2022 रोजी विभूतवाडी येथे येणार आहेत .त्याचा निषेध करण्यासाठी दिनांक 20/6/ 2022 रोजी आम्ही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतकरी संघटना ठिय्या आंदोलन करणार व गाढवाला सोबत घेऊन गाजर दाखवणे आंदोलन करणार आहे .
विभूतवाडी येथील शेतकऱ्यांचा ताबा प्रक्रिया शेतकरी संघटना उधळून लावणार आहे सदर आंदोलनाची दखल घेऊन सदर बाब महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आणून द्यावी असे निवेदनात म्हटले आहे