
दैनिक चालू वार्ता वडेपूरी प्रतिनिधि-मारोती कदम
आज वटपौर्णिमेनिमित्त लोहा शहरामध्ये देऊळगल्ली येथे भाजपाच्या प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते महिलांना वटवृक्षाचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित भाजपा महिला मोर्चा च्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता ताई देवरे ,वैशाली ताई चिखलीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सौ चित्ररेखा गोरे,शितल ताई किरवले,सुरेखा वाले ,कल्पना ताई चव्हाण, शोभाताई बगाडे ताई ,पुष्पा ताई तेललवार ,सविता सातेगांवे, ज्योती रहाटकर ,व उपस्थित माता-भगिनी उपस्थित होत्या
यावेळी पर्यावरणातील झाडाचे महत्व सांगितले. झाड लावून सर्व पर्यावरण हवा शुद्ध ठेवण्याचे कार्य करते असे महत्त्व प्रणिताताई चिखलीकर ताईसाहेब यानी सांगितले,पाऊस सुद्धा झाडामुळे पडतो म्हणून वटवृक्ष जपणूक करावी झाडे लावा झाडे जगवा. हा संदेश या वटपौर्णिमा वटवृक्ष वाटप कार्यक्रमातून दिला..