
दैनिक चालू वार्ता जव्हार.प्रतिनिधी-दिपक काकरा.
नगराध्यक्ष फडवळेंनी वाहिली श्रध्दांजली
जव्हार– विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे (माडाचापाडा) येथील जवान महेश फडवळे हे देश सेवेसाठी पंजाब प्रांतातील भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात होते.५ जूनला त्यांना सर्पदंश झाल्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले.त्यांच्या निधनाची बातमी विक्रमगड तालुक्यासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली आणि जिल्ह्याभरात शोककळा पसरली.शाहिद जवान महेश यांच्या कुटुंबाला एक मदतीचा हात म्हणून जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विक्रमगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पिंका फडवळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शाहिद जवानाच्या कुटुंबाला आर्थिक स्वरूपात मदत करून भविष्यात अमर जवानाच्या कुटुंबातील व्यक्तींना व मुलांना आरोग्य तसेच शिक्षणाची गरज लागल्यास सदैव जिजाऊ संस्था कुटुंबाच्या पाठीशी असेल असे आश्वासन शाहिद कुटुंबाला संस्थेकडून देण्यात आले.