
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
आज वाकडपाडा जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात साप समज गैरसमज प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी श्री दत्तात्रय ठोमरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकरी, शेतकरी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांना आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप वाघ यांनी सन्मान पत्र देऊन सत्कार केला, यावेळी श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की आपल्या भागातील तरुणांनी पुढाकार घेत सामाजिक कार्य हाती घेतले आहे, यामुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले आहेत, तसेच सर्प देखील सुरक्षित सोडुन दिले जातात त्यामुळे प्राणी संरक्षण देखील होत आहे.या प्रशिक्षणा मुळे सापा बदल चे अनेक गैरसमज दूर होतील,अशा प्रकारे तालुक्यातील अनेक ठिकाणी माहिती दिली जावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी श्री प्रदीप वाघ, भरत गारे गुरुजी, श्री दिलीप जागले, श्री संजय वाघ, श्री हेमत लहामगे सर, श्री विरकर केंद्र प्रमुख, श्री रमेश बोटे, श्री दिनकर सर मुख्याध्यापक, श्री नंदकुमार वाघ चेअरमन, श्री लालासाहेब धायगुडे सर श्री गांगवे सर, श्री भेरे सर, श्री नितीन पिठोले, श्री विलास फसाळे, नरेंद्र वाघ,केशव काळे, तुकाराम जाबर,हर्षदा खादे, श्री देवराम वाघ