
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
ईट:- भूम तालुक्यातील गावा गावात जवळपास प्रत्येक सौभाग्यवतीनी वटसावित्रीची पौर्णिमा उत्साहात साजरी करून सौभाग्याच्या पुनर्जन्मासाठी साकडे घातले . परंतु ईट भागांमध्ये मात्र महिलांनी वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी वृक्षारोपण करून समाजात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे .
प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या ऋतूमध्ये वटसावित्री पौर्णिमा असते . हा काळ म्हणजे सर्वत्र हिरवळ निर्माण करणारा . वनराईने . डोंगरदऱ्यांनी हिरवा शालू पांघरलेला . प्रत्येक झाडांना हिरवी गार पालवी फुटलेली असते . अशातच शेकडो झाडांची किमया एकाचं वृक्षात असलेले झाड म्हणजे वडाचे झाड . या झाडाला ऐतिहासिक . आयुर्वेदिक असेल किंवा धार्मिक स्वरूपाचे महत्त्व आहे .
अशा या वडाची पूजा प्रत्येक वर्षी प्रत्येक सौभाग्यवती महिला मनोभावे भक्ती भावाने करतात आणि जन्मोजन्मी किंवा सौभाग्याला पुनर्जन्म मिळू दे अशा प्रकारचं साकडं घालतात.
तालुक्यातील ईट भागामध्ये मात्र या वटसावित्रीच्या सणाला एक वेगळा साज चढवण्यात आला . या वटसावित्रीच्या सणाच्या निमित्ताने अनेक महिलांनी सामाजिक वनीकरण अधिकारी अधिकारी बी व्ही सदानंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद प्रतिसाद देत अनेक झाडांचे वृक्षारोपण करून समाजामध्ये ही वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे .
या वृक्षा रोपणाच्या कार्यक्रमासाठी सौ . वैशाली पांडुरंग हाडूळे . सौं . मनीषा शंकर राऊत . सौ मंगल आप्पासाहेब चव्हाण . सौ सत्यभामा रमेश कळसकर . सौ .इंदुमती बाळासाहेब वाघमोडे . सौ कोकिळा सोमनाथ खंडागळे . सौ इंदुमती नवनाथ येडे यांनी वृक्षारोपण केले तर त्यांना सामाजिक वनपरिक्षेत्र अधिकारी बी व्ही सदानंदे . वनपाल एस एस कांबळे . पत्रकार बाळासाहेब स्वामी . बाळासाहेब वाघमोडे . गणेश देवरे . अनिल ठोंबरे . सचिन चोरमले . भीमा चोरमले . बबन सावंत यांनी सहकार्य केले .