
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने जोतिबाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचा आवार गजबजला आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ,गुलाबपुष्प आणि चॉकलेट देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी भव्य स्वरूपात ट्रॅक्टर मधून नव विद्यार्थ्यांची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.शाळेच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या,तोरण, फुलांनी सजविलेले वर्ग आणि संगीताच्या सुरावटीने मुलांचे स्वागत करण्यात आले. नवागतांचा हा स्वागत सोहळा उत्सहात रंगला.तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले.
यावेळी शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष दादासाहेब भगत,केंद्र प्रमुख आर.एस.राऊत शाळेचे मुख्याध्यापक मारुती कोकाटे शाळेतील शिक्षक एस डी भगत,ए एम चव्हाण,डी डी दहातोडे,एम यू मुंढे,एन एच यादव ,अंगणवाडी सेविका तसेच नवागत बालकांचे पालक उपस्थित होते.
प्रतिक्रिया
शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचे आयुष्य समृद्ध करणारी पाऊलवाट आहे. कोरोना नंतरच्या प्रदीर्घ कालावधीनंतर नवविद्यार्थी शाळेमध्ये जाऊन शैक्षणिक वाटचालीची सुरुवात करीत आहे. ऑनलाइन ते ऑफलाइन या प्रवासानंतर विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला आहे हे शैक्षणिक वर्ष ज्ञानमय,आनंदीमय राहील हीच सर्वांना आशा आहे.
– लक्ष्मण जाधव
जोतिबाचीवाडी युवक