
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा – जि. प. प्रा. शाळा पांगरी येथे शाळापूर्व तयारी अंतर्गत माननीय शिक्षणाधिकारी( प्रा) यांच्या दिनांक 3 जून 2022 च्या पत्रातील मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करण्यात आली. सर्वप्रथम गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत पहिलीत प्रवेशित मुलांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले व त्यांच्या पायांचे ठसे घेण्यात आले. पहिलीत प्रवेशित मुलांचे प्रवेश अर्ज भरण्यात आले .सर्व टेबल वरील मांडलेल्या साहित्याच्या मदतीने मुलांना बोलते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
सर्व मुलांना शालेय पोषण आहार व पूरक आहाराचे वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत विठ्ठल पवार ,उपाध्यक्ष गणेश धोंडीबा बुद्रुक, सरपंच, उपसरपंच, शिक्षणप्रेमी नागरिक, ग्रामपंचायत सदस्य व सर्व पालक उपस्थित होते. मेळाव्याला शाळेचे मुख्याध्यापक श्री बट्टलवाड एम. डी. यांनी मार्गदर्शन केले. सहशिक्षक श्री गोंड ई. बी. व शिक्षिका सौ. श्रीमंगले आर. डब्ल्यू. यांनी सहकार्य केले.