
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- ओबीसी आरक्षणासाठी मागच्या काही दिवसात सॉफ्टवेअरमध्ये जी नावं फिड करण्यात आली.ती विशिष्ट जातीची असल्याचं दिसून आलं आहे.परंतु,एकच आडनाव अनेक जातीत असतं.त्यामुळे अशा पद्धतीने डेटा भरल्यास सॉफ्टवेअरमध्ये चुकीची माहिती फिड होणार आहे.त्यामुळे अडचण निर्माण होणार आहे.आमचं म्हणणं आहे की मतदान ओळखपत्र घ्या आणि त्याआधारे माहिती गोळा करा.परंतु तसं करण्यात आलं नाही.त्यामुळे ओबीसी आरक्षणाची (reservation) कत्तल होईल अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.छगनजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासन दरबारी निवेदनामार्फत आंदोलनाचा इशारा दिला.असं समता परिषदचे जिल्हाध्यक्ष विपुल नाथे यांनी सांगितलं.मोठया शहरात पाच टक्के आणि सहा टक्के ओबीसी आहेत,असं जमा करण्यात आलेला डेटा सांगतो.असं कसं असू शकतं?झोपडपट्टीत राहणारे एक तर दलित आहेत किंवा ओबीसी आहेत.मग तरी लोकसंख्या कमी कशी काय?असा सवाल समता परिषदचे जिल्हाध्यक्ष विपुल नाथे यांनी केला.हा ओबीसींच्या आयुष्याचा प्रश्न आहे.त्यामुळे यंत्रणेने तपासून घ्यायला हवे…असे विपुल नाथे यांनी मीडियाशी संवाद साधतांना बोलत होते.
यावेळी विदर्भकुमार बोबडे,अरुण जुनगरे,नाजीम कादिर,दिपेश अवधने,अतुल वर्हेकर,विशाल बोबडे,उज्वल चांदूरकर,प्रज्वल फुलारी,सुकेश अडगोकर,अनंत फुलारी,स्वराज चांदूरकर,अंकुश बोरखडे व आदी महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.