
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:यंदाचा महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. १० वीच्या परीक्षेत एकूण 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी पुन्हा एकदा मुलांना मागे टाकले आहे. ९७.९६ टक्के मुली आणि ९६.०६ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत 3.01 टक्के कमी निकाल लागला आहे. गतवर्षी निकाल विक्रमी ९९.९५ टक्के लागला कारण कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या आणि निकाल एका सूत्राच्या आधारे काढण्यात आला होता.
महाराष्ट्र बोर्डाची एसएससी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात आली.
महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी परीक्षेत एकूण 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 889506 मुले आणि 749458 मुलींचा समावेश होता. परीक्षेसाठी मुंबई विभागातून एकूण 373840 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. मुलांना एका सूत्राच्या आधारे पास करण्यात आले. यापूर्वी महाराष्ट्राचा 12वीचा निकाल 2022 जाहीर झाला आहे. बारावीत ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विभागनिहाय निकाल
पुणे: 96.96%
नागपूर: 97%
औरंगाबाद: 96.33%
मुंबई: 96.94%
कोल्हापूर: 98.50%
अमरावती: 96.81%
नाशिक: 95.90%
लातूर: 97.27%
कोकण: 99.27%