
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
उस्माननगर:-यशाचा उत्तुंग आलेख आणि यशाप्रद वाटचाल करण्यासाठी आदरणीय बालाजी पाटील पांडागळे साहेब यांचे मार्गदर्शन आणि त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाची मेहनत आज फळाला आली.
आम्ही जागतो पालकांच्या स्वप्नांना आणि त्यांना मूर्त रूप प्राप्त करून देण्यासाठी घेतो ती मेहनत.यामुळेच वर्षानुवर्ष त्रिमूर्ती विद्यालयाचा यशाचा आलेख वाढतानाच दिसतोय.
आजच्या या निकालात एकूण ३८ विद्यार्थी परीक्षा प्रविष्ट होते सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत क्षमता सिद्ध करत उच्चतम गुणांना गवसणी घातली आहे.
या निकालात एकूण १७ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले.प्रथम श्रेणीत १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत….तर ०३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.त्रिमूर्ती विद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे