
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- मनोविकास शाळेतूनच नव्हे तर कंधार लोहा तालुक्यातील प्रथम येण्याचा बहुमान व विज्ञान, सामाजिकशास्त्र या विषयात १०० पैकी १०० गुण घेऊन शाळेची गुणवंत विद्यार्थीनी कु. वैष्णवी अशोकराव गुट्टे या विद्यार्थिनीने गुण प्राप्त केले. मनोविकास माध्यमिक विद्यालय कंधार शाळेचा एस एस सी परीक्षेचा निकाल ९६.९२% लागला आहे. १३ विद्यार्थी हे ९०% टक्क्यांपेक्षा जास्त मार्कानी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मनोविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एॅड. बाबुराव पुलकुंडवार साहेब, उपाध्यक्ष एॅड. लक्ष्मीकांत मुखेडकर साहेब, कोषाध्यक्ष श्री. विकास बिडवई साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका कु. सरनाईक मॅडम, उप मुख्याध्यापक श्री. एन. व्ही. बंडेवार यांच्या हस्ते झाला. या सत्कार प्रसंगी श्री. पतंगा सर, श्रीमती देशमुख मॅडम, श्री. पुलकुंडवार सर, श्री. मामडे सर, श्री. के. के. सर, श्री. जाधव सर, श्री. बाळासाहेब पवार सर, श्री. मोरे सर, श्री. तेलंगे सर, श्री. गरुडकर सर, राऊत सर, शेळके सर, गायकवाड सर, घोडेकर सर, बिल्लावर सर, वंगलवार सर, अन्सापुरे सर, डोम्पले सर, जे. पी. सर, भंडारे सर, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.