
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
अक्कलकुवा तालुकास्तरीय शाळा प्रवेश उत्सव
व शाळा पुर्व तयारीचा दुसरा मेळावा जिल्हा परिषद.केंद्र शाळा पिंपळखुंटा येथे संपन्न झाला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी . जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती निर्मला राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत,अक्कलकुवा पंचायत समितीचे उपसभापती विजय पाडवी ,पं.स.सदस्य अशोक राऊत,पं स.सदस्य आपसिंग वसावे,गट शिक्षण अधिकारी आर. आर.देसले,
एम.आर.निकुंभ ,विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख सिकंदर पावरा, पिंपळखुंटा, आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी
उपस्थितांना जिल्हा परिषद शाळेचे महत्व व शाळेतुन विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सेवा सुविधा या बद्दल माहिती दिली.याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले.तत्पुर्वी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातुन शैक्षणिक जनजागृती रॅली काढली या रॅलीत मान्यवरांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य, पालक, शिक्षण प्रेमी,आदी उपस्थित होते.