दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांचे विद्यमान आणि चौथ्यांदा ऐतिहासिक सातारा जिल्ह्यांला मुख्यमंत्री पद मिळाले असून महाराष्ट्रांचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून सातारा जिल्ह्यासह सर्व जनतेकडूंन त्यांचे अभिनंदन व त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यांत आला. यावेळी त्यांच्या मूळगावी जावली महाबळेश्वर तालुक्यांतील दरे उर्फ तांब या ठिकाणी गावात गावकऱ्यांनी पेढे वाटून आपला आनंद उत्सव साजरा केला. सातारा ,पुणे ,सांगली कोल्हापूर ,सोलापूर या ग्रामीण भागातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहासांठी तरुण पुणे मुंबई मोठ मोठ्या शहरांमध्ये जात असतात. सातारा जिल्ह्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा आपल्या गावाकडे शेतीतील कामे करीत आपल्या उदारनिर्वासांठी ते मुंबई ठाणे येथे स्थायिक झाले असुन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याच वर्षात गावाकडे येऊन आपल्या शेतामध्ये भात लागवड केली होती. त्यांचा याच वर्षातील फोटो शेतामध्ये भात लावण्यांच्या कामात ते व्यस्त असल्यांचे दिसत होते. त्यांचे फोटो सोशल मीडियावरुन वायरल होते असल्यांचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे प्रथमच ऐतिहासिक सातारा जिल्हा दौऱ्यावर येणार असल्यांची माहिती समोर आली आहे. गावाकडूंन आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासांठी गेलेला तरुण आज महाराष्ट्रांचा मुख्यमंत्री झाला आणि तेही ऐतिहासिक सातारा जिल्ह्यांला मुख्यमंत्रीपद मिळाले हे सातारा जिल्हा वासियांचे मोठे भाग्यच म्हणावं लागेल.
