अमरावती (प्रतिनिधी ) – संजय सरवटकर
अमरावती (प्रतिनिधी )- भातकुली तालुक्यातील पूर्णानगर येथील मो. मकसूद मो. लुकमान (ह. मु. छायानगर, अमरावती ) यांचा आपल्या मोठया सख्या भावानेच मध्य रात्री खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा खून संपत्तीच्या वादातून झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्ह्यांची नोंद केली आहे, याबाबत असे की, पूर्णानगर येथील प्रतिष्टीत असलेले मो.लुकमान दिवाणजी यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यांना एकूण पाच मुले असून दोन असल्याचे समजते त्यापैकी तीन भाऊ अमरावती राहायला गेले असून दोन भाऊ गावात राहतात. 1मे ला शुक्रवारच्या रात्री मृतक मो मकसूद च्या घरी त्याचे दोन भाऊ गेले तेथे त्यांनी संपत्ती बाबत चर्चा केली. चर्चे चे रूपांतर वादात झाले. वाद इतका वाढला की, मकसूद चा मोठा भाऊ अब्दुल तसकीन अ. लुकमान याने रागाच्या भारत आपला लहान मकसूद च्या अंगावर सपासप चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्याचा दुसरा भाऊ भांडण सोडण्यासाठी गेला असता तोही जखमी झाला. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मो. मकसूद ला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती नागपूर गेट पोलीस स्टेशन ला कळताच पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला व आरोपीला ताब्यात घेतले, अन्य दोन जण फरार असल्याचे समजले असून पोलीस त्यांचा तपास करीत आहे.पोलिसांनी यासंदर्भात आरोपी विरुद्ध भांदवि 103(1),118(1),3(5) प्रमाणे गुन्हा नोंदवीला असून नागपूर गेट पोलीस स्टेशन चे ठाणेदार आपल्या टीमसह अधिक तपास करीत आहे.
