वसमत प्रतिनिधी -बालाजी अडकिने
वसमत पंचायत समितीचे माजी सभापती तथा लोकप्रिय आमदार राजुभैय्या नवघरे यांचे मामा श्री. प्रकाशराव शेषराव ढोणे (वय ६२) यांचे आज हृदयद्रावक अपघाती निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने वसमतसह पूर्णा तालुका आणि संपूर्ण परभणी जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
प्रकाशराव ढोणे यांनी आपल्या कार्यकाळात पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवले. ग्रामीण भागातील विकासकामे, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ यामुळे त्यांनी जनमानसात विशेष स्थान निर्माण केले होते. मितभाषी, संयमी आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून शोकसंदेशांचा वर्षाव होत असून, आमदार राजुभैय्या नवघरे व त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात सर्वजण सहभागी झाले आहेत.
“जनतेच्या सेवेत आयुष्य वेचलेले एक कर्तव्यदक्ष नेतृत्व हरपले…”
