दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी- श्री.रमेश राठोड
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
साई वासल्य बहुउद्देशीय संस्था कोपरगाव. अहमदनगर व स्काय इंटरनॅशनल टूरीझम महाराष्ट्र. यांचे संयुक्त विद्यमाने श्री साई बाबांच्या वास्तव्याने पूनीत झालेल्या पवित्र भुमीत श्री साई सामाजिक व सांस्कृतिक संमेलन आणि उल्लेखनीय कार्य कर्तृत्वाने समाजात ठसा निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा कौतुक सन्मान सोहळा दि.3.7.2022 ला साई सिल्वर ओक शिर्डी येथे आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्या मध्ये माळेगाव ता. आर्णी जि.यवतमाळ येथील प्रसिद्ध गायक तथा सिनेकलावंत सुनिल रामचंद्र चव्हाण यांना अभिनेते दिगंबर नाईक यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र साई रत्न पुरस्कार ‘देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षा सौ.निता माळी पनवेल ह्या होत्या तर उद्घाटक सौ. भाग्यश्री बानायत भा. प्र.से.साई संस्थान ह्या होत्या. प्रमुख अतिथी श्री काकासाहेब डोईफोडे मुख्य अधिकारी नगरपालिका शिर्डी. गुलाबराव पाटील पोलीस निरीक्षक शिर्डी हे होते. या सोहळ्याचे आयोजन प्रा.डाॅ.बी.एन.खरात यांनी केले होते तर निवड समितीच्या अध्यक्षा सौ. रत्ना पाटील चांदगुडे ह्या होत्या. सुनिल चव्हाण यांनी स्त्री व पुरूष च्या आवाजात गायन करून प्रेक्षकांची वाह वाह मिळवली
