
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा :-दि.५.आपल्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी स्वस्त धान्य दुकानदार संघटना नांदुरा तालुक्याच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करुन व प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना नांदुरा तहसीलदार यांचे मार्फत निवेदन दिनांक ४जुलै रोजी देण्यात आले आहे
निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना द्वारे सर्व परवानाधारकांना वर्ल्ड फुड प्रोग्राम अंतर्गत ४४०रुपये प्रति क्विंटल कमिशन देण्यात यावे, किंवा दरमहा ५०,०००रुपये निश्चित मानधन घोषित करावे ,फक्त गहू तांदूळ अंत्योदय कार्ड धारकांना साखर या खाद्य पदार्थांची १किलो प्रति क्विंटल हन्डलिंग तुट देण्यासाठी निर्णय घेवून कारवाई करण्यात यावी ,गहू तांदूळ या व्यतिरिक्त खाद्यतेल व दाळी दरमहा देण्यात याव्या, स्वस्त धान्य दुकानदार यांना एल पी जी गॅस सिलेंडर विक्री व कमिशनची निश्चिती करावी, कोरोना महामारीमध्ये बळी पडलेल्या परवाना धारकांना ठराविक स्वरुपात मदत करुन कोरोना योध्दा घोषित करावे, केन्द्र सरकारने वाढविलेले २०रुपये ३७रुपये कमिशनची रक्कम देण्यात यावी, पश्चिम बंगालच्या धर्तीवर सर्वासाठी अन्न या योजनेअंतर्गत सर्व कार्ड धारकांना मोफत अन्न देण्याची योजना आखण्यात यावी, वरील सर्व मागण्या बाबत देशपातळीवरील संघटनेने मान्यता दिली आहे त्यानुसार आंदोलनात आज तालुका पातळीवर धरणे आंदोलन करुन निवेदन दिले आहे निवेदनावर समाधान पाटील नांदुरा तालुकाध्यक्ष, के. यु. काटे उपाध्यक्ष, डि. ए. मुकुंद सचिव, रामासेठ नवगजे शहराध्यक्ष, ए. पी. राका शहर सचिव यांच्या सह्या आहेत यावेळी तालुक्यातील बहुसंख्येने स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.