
उदगीर / प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद ग्रामसेवा प्रतिष्ठान द्वारा संचलित महात्मा पब्लिक स्कूल उदगीर येथे डॉक्टर्स डे व कृषी दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉक्टरांची व शेतकऱ्यांची वेशभूषा परिधान केलेल्या होत्या. यावेळी उदगीरचे प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.विद्यासागर आचोले यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉक्टर आचोले यांचा स्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या संचालिका सौ.संगीता दिपक नेत्रगावे-पाटील, मुख्याध्यापिका सौ.स्मिता तिवारी, तसेच सहशिक्षिका मोनिका सुने, अश्विनी ममदापूरे , शिवकन्या वाघमारे, शिल्पा सांगवे, पांचाळ मावशी यांचे सहकार्य लाभले.