
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
उदगीर / प्रतिनिधी
दि.६ रोजी मौजे भाकसखेडा (प), ता.उदगीर येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (मुख्य कार्यालय) मार्फत नाबार्डच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त आर्थिक साक्षरता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना जिल्हा बँकेच्या विविध योजना, पीक विमा, शिष्यवृत्ती योजना, शैक्षणिक कर्ज आदी. विविध विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य लेखा परिक्षक मा.व्यंकटराव चंदरराव बिरादार साहेब, फिल्ड ऑफिसर मा.हणमंत पवार साहेब, ब्रँच इन्स्पेक्टर मा.अण्णासाहेब मुळे साहेब, वि.का.सोसायटीचे चेअरमन विवेक जाधव, सचिव दत्ता सुर्यवंशी, माजी सरपंच प्रकाश जाधव, विठ्ठलराव जाधव, सतीश मोरे, लिंबाजी खेडकर, जनार्धन जाधव, माधवराव टेकपुंजे, तुकाराम मोरे, श्याम जाधव, दयानंद मोरे, माधव जाधव, संजय तोबरे, अभिषेक जाधव, कृष्णा बुर्ले जि.प. शाळेचे सहाशिक्षक मा.खंडेराव शिंदे सर, मा.उमाकांत कंजे सर, शेतकरी, विद्यार्थी व युवक उपस्थित होते.