
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर
कृषि महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा उदगीर येथील विद्यार्थी कृषिदुत म्हणून ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम ( RAWE) या राज्यस्तरीय कार्यक्रमांतर्गत तिवटग्याळ येथे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या अनुषंगाने तिवटग्याळ येथे महाराष्ट्र राज्याचे दीर्घकाळ राहिलेले मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांची जयंती आणि कृषि दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम ( RAWE) ङाॅ. ङी.एन. गोखले, संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता(कृषि), व.न.म.कृ., परभणी, ङाॅ. आर.पी. कदम, विस्तार शिक्षण विभाग, व.न.म.कृ., परभणी आणी कृषि महाविद्यालय लातूरचे कार्यक्रम समन्वयक ङाॅ. व्ही. बी.कांबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एम.पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस.एन. वानोळे, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. बि. मलभागे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे सरपंच पुत्र श्री गजानन नरहरे, प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. या अनुषंगाने गावामध्ये कृषिदुत साकुळे आर. व्ही. , नितीन राठोड, रणजीत रुपनर, आकाश सोळुंके, सय्यद फुरकान, नानी थरण व आशिष राठोड यांनी वृक्षलागवड , कृषि दिनाविषयी जनजागृती, शेतकर्यांना वृक्षभेट, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षदिंडी अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच पुत्र श्री गजानन नरहरे, प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कैलास तवर, पोलीस पाटील श्री धनराज पाटील, शिक्षण प्रेमी जयशिंग पाटील आदी जण होते
शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, व कृषिदूत साकुळे आर. व्ही. यांनी मार्गदर्शन केले, व सुत्रसंचलन आकाश सोळुंके, आभार प्रदर्शन नितीन राठोड , प्रस्तावना रणजीत रुपनर आणि कार्यक्रमाची रूपरेषा कृषिदूतानी केले. कार्यक्रमात विद्यार्थी, शेतकरी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.