
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी जळकोट-हानमंत गित्ते.
जळकोट तालुक्यातील मौ. वांजरवाडा ते होकर्णा जाणाऱ्या रस्त्याचे काम मागील २ ते ३ महिन्यापूर्वी झाले असून या रस्त्याला २ ते ३ महिन्याच्या आत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यावरून असे लक्षात येते की रस्त्यात वापरण्यात आलेला डांबर व इतर मटेरियल हे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे वापरण्यात आले आहेत या गुत्तेदरा मार्फत शासनाच्या नधीचा अपहार करण्यात आला आहे.
तरी या ठिकाणी केलेल्या डांबरीकरणाची तातकाळ चौकशी करून या गुत्तेदारावर कायदेशीर कारवाई करत त्याचे लायसन ब्लॅकलिस्ट करण्यात यावे व या गुत्तेदाराकडून शासनाच्या उचललेल्या निधीचे परत वसुली करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना याविरोधात तीव्र आंदोलन छडील अशा प्रकारचे निवेदन आज तहसीलदार मॅडम सौ. सुरेखा स्वामी यांना देण्यात आले, त्याप्रसंगी शेतकरी सेना तालुकाध्यक्ष महेश देशमुख, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष शुभम चंदनशिवे, शेतकरी सेना तालुका उपाध्यक्ष गजानन पदमपल्ले, उमरदार शाखाध्यक्ष लक्ष्मण लांडगे, उमरदरा शाखा उपाध्यक्ष परशुराम गुट्टे, चंद्रकांत थोटे ऋषिकेश भोंग, सौरभ भाऊ आदी पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.