दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : राज्यातील टेक्सटाइल पार्क, मेडिकल पार्क आणि बल्क ड्रग पार्क यांना केंद्र शासनाने लवकरात लवकर मान्यता दिल्यास काम जलद गतीने सुरू होऊन राज्याला आणि केंद्राला फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाच्या अपेक्स अथॉरिटीची पहिली बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रालयातून या बैठकीत सहभागी झाले, यावेळी ते बोलत होते.
