
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : डोंबिवलीत आता मनसेने शिवसेनेला झटका दिला आहे. शिवसेनेच्या संघटनेमधील तब्बल १२० रिक्षाचालकांनी मनसेच्या संघटनेत प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून व मनसे पदाधिकारी प्रदीप चौधरी यांच्या प्रयत्नातून ठाकुर्ली रेल्वे स्थानक शेजारील रिक्षा स्टँडचे नूतनीकरण करण्यात आले. याचे उद्घाटन वाहतूक सेनेचे सरचिटणीस अरिफभाई शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहर संघटक योगेश पाटील, अरुण जांभळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना त्यांचा रिक्षा चालक म्हणून उल्लेख केला होता. १२० रिक्षाचालक गेले ३० वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून या रिक्षा संघटनेत कार्यरत होते. हे सर्व राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेत सामील झाले आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी दिली.