
दैनिक चालु वार्ता कोरपना प्रतिनिधी -प्रदिप मडावी
मूख्य रस्त्यांवरील खड्डे त्वरित भूजवा बिरसा फायटर्स चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप मडावी यांची प्रशासनाला विनंती
चंद्रपूर शहर हे एक ॵद्यैगिक शहर म्हणून ओळखल्या जाते कारण सर्वात मोठ मोठे सिमेंट कारखाने चंद्रपूर जिल्ह्यात आहे.
त्यामुळे कोरपना तालुक्यातील गडचांदूर कोरपना मूख्य महामार्ग तसेच गडचांदूर नांदा फाटा, आवाळपूर इथे अल्ट्राटेक सिमेंट कारखाना असल्याने नांदा फाटा, आवाळपूर, भोयेगाव तसेच सांगोळा अंतरगाव जवळपास दालमीया सिमेंट कारखाना आहे,
त्यामुळे नांदा फाटा, आवाळपूर, भोयेगाव, वणी, या मूख्य महामार्गावरून सिमेंट भरलेल्या ओव्हरलोड गाड्या दररोज या मार्गाने धावत असतात पण या रस्त्यांची अवस्था अशी झाली आहे की या मार्गावरून एक टू व्हीलर जाणे सूध्दा मूशकील झाले आहे,
त्यातच नांदा फाटा, आवाळपूर या मार्गावरून दररोज कारखान्यात काम करणारे कामगार तसेच शाळेतील विद्यार्थी यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो,
तसेच या मार्गावरून प्रवास करणारे प्रत्येक प्रवासी त्रासलेले आहे म्हणूनचं काय ते झाडं काय ती डोंगर काय होटल सर्व ओके आहे हे सर्व नेते मंडळी च झालं असेल तर थोळा वेळ जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी द्यावे पावसाळ्याचे दिवस सुरु आहे रोडवरील खंड्या मध्ये पाणी साचलेल असते त्यामुळे रस्ता समजणार नाही आणि अपघात होण्याची शक्यता असते चूकून ही अस काही विपरीत घडू नये म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर रोडवरील खंड्डे भूजवण्याचे काम सुरू करा किंवा रोड पूर्ण पने रिपेरींग च काम चालू करा अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब तसेच आमदार खासदार साहेब यांना, पत्रकार, समाज सेवक, तसेच बिरसा फायटर्स चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप मडावी यांनी प्रशासनाला विनंती केली आहे.