
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
सिल्लोड तालुक्यातील अनाड येथील रहिवाशी असलेले व आपल्या निर्भीड शैलीतून समाजाला व सर्वसामान्यांना उचित न्याय देणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संदीप दादाराव मानकर यांची राज्यव्यापी असलेल्या मातंग एकता आंदोलन या सामाजिक संघटनेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री रमेश बागवे, राज्य कार्याध्यक्ष तथा पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अविनाश बागवे, जिल्हा नियोजन समितीचे राजू आहिरे यांचे हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी राज्य सहसचिव चंद्रकांत काळोखे, राज्य समन्वयक विठ्ठल थोरात, रमेश सकट, अशोक कांबळे, सखाराम आहिरे आदी पदाधिकाऱ्यांसहित औरंगाबाद शहर व ग्रामीण मधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते समाजबांधव व भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यांसोबतच अशोक पाचुंदे यांची राज्य सचिव पदी, अशोक शिरसाठ यांची जिल्हा सचिव पदी, किशोर तुपे यांची शहराध्यक्ष पदी, राजश्री साठे यांची महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पदी निवड करण्यात आली. उपस्थित सर्वांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..!!